Empowering Women for a Brighter Future: The Role of Lek Ladki Yojana : 1 लाख रूपये मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल?

Lek Ladki Yojana 2024:महाराष्ट्रातील 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्र्यांच्या सादरीकरणात अजित पवार यांनी अनेक नवीन उपक्रमांची ओळख करून दिली. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘लेक लाडकी(Lek Ladki)’, ज्याचा उद्देश मुलींना 1.01 लाख रुपयांचे अनुदान देऊन त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्षम बनवणे. गंभीर कुपोषित मुलांवर लक्ष केंद्रित करून शहरी भागातील कुपोषणावर आणखी एक उपक्रम आहे. या व्यतिरिक्त, राज्य ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान’ राबवत आहे, ज्याचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यातील 1 लाख महिलांना विविध सरकारी योजनांद्वारे लाभ देण्याचे आहे. 10 प्रमुख शहरांमध्ये 5,000 महिलांना गुलाबी रिक्षा देण्याची त्यांची योजना आहे. शिवाय, त्यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या 14,000 रिक्त जागा यशस्वीरित्या भरल्या आहेत, उर्वरित रिक्त जागा लवकरच भरण्याची योजना आहे.

Lek ladki Yojana

Table of Contents

योजनेची उद्दिष्टे

  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढहवणे.
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
  • मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
  • कुपोषण कमी करणे.
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करण

अटी व शर्ती

  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दनाांक 1 April,2023 रोजी वा त्यानांतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्पत्यासाठी अर्जसादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आले असल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना [स्वतंत्र] ही योजना अनुज्ञेय राहील मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्य चे रहिवाशी असणे आवश्यक राहील
  • लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लाख पेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला.
  • कुटुंबप्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला [वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे]. याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी याचा दाखला आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे आधार कार्ड [प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील].
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • रेशन कार्ड [पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत].
  • मतदान ओळखपत्र [शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला].
  • संबंधित टप्प्यावरील लाभारकरिता शिक्षण घेत असल्याबाबतची संबंधित शाळेचा दाखला [बोनाफाईड].
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र [“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार].
  • अंतिम लाभाकरिता मुलीच्या विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र.

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक मदत नेमकी कशी आणि किती मिळणार

मुलगी साठी बचत

Lek Ladki Yojana 2024

विवरण रक्कम
मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000
मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000
मुलगी सहावीत गेल्यावर 7,000
मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000
एकूण 101,000

अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारच्या ‘लेक लाडकी योजनेत मुलींना एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.

Lek Ladki योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती

सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर मुलींचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयाबाबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी त्यांचे स्तरावरून सुधारणा कराव्यात असे जीआर मध्ये नमूद केले आहे.

सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

अंगणवाडी सेविकांना संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा. गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अर्ज भरण्यास मदत करावी व सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका /मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.

Lek Ladki Yojana अधिकृत वेबसाईट

या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्या आणि ते कसे करायचे याची सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.

Lek Ladki योजनेअंतर्गत ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करायचं

  • आपल्याला अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जाण्याची आवश्यकता असेल.
  • जेव्हा तुम्ही होम पेजवर असाल तेव्हा तुम्हाला लेक लाडकी योजना दिसेल, त्याच नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि Apply बटण दिसेल.
  • तुम्हाला खाते तयार करण्याची विनंती केली जाईल, तुम्ही ते तुमच्या विद्यमान ईमेलने तयार करू शकता, तुम्हाला एक मोबाइल नंबर लागेल ज्यावर OTP येईल.
  • एकदा सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर, तुमचे खाते सत्यापित केले जाईल जेणेकरून तुम्ही लॉग इन करण्यास सक्षम व्हाल.
  • लॉगिन केल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
  • दस्तऐवज यशस्वीरित्या अपलोड केल्यानंतर, सबमिट बटण क्लिक करा.
  • अशा प्रकारे माहिती सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमचा अर्जही पूर्ण होईल.

Credit: News18 Lokmat

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top